‘गोविंदाबद्दल असं कसं बोलू शकते?’ सुनिताच्या खिल्लीवर चाहते संतापले.. नक्की काय म्हणाली ?
‘गोविंदाबद्दल असं कसं बोलू शकते?’ सुनिताच्या खिल्लीवर चाहते संतापले.. नक्की काय म्हणाली ?
img
Nandini khandare More

आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखली जाणारी सुनिता या एका कार्यक्रमातसुद्धा पती गोविंदाची खिल्ली उडवताना दिसली. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.‘माँ है ना’ या शोच्या ट्रेलर लाँचदरम्यान सुनिता अहुजा पापाराझींसोबत मस्करी करताना दिसली. पापाराझींशी बोलताना सुनिता म्हणते की, बकरी है. यावर मागून आवाज येतो की, तो तुमचा नवरा आहे. हे ऐकून सुनिता चकीत होते आणि म्हणते, माझा नवरा.. तो बकरी नाही. मग इशारा करत म्हणते की, तो बकरा आहे. सुनिताच्या तोंडून हे शब्द ऐकून तिच्या बाजूला उभी असलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकियासुद्धा थक्क होते. सुनिताचं असं बोलणं उर्वशीला अजिबात रुचलं नसल्याचं तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येतं.

सुनिता अहुजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी तिच्यावर टीका करू लागले आहेत. ‘हे खूप चुकीचं आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आज तू जी काही आहेस, ते गोविंदामुळेच आहेस आणि त्याचीच खिल्ली उडवतेस’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. ‘गोविंदाशिवाय तुझं अस्तित्त्व काहीच नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुनितावर टीका केली. तिने अशा पद्धतीने गोविंदाची मस्करी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही काळापासून सुनिता आणि गोविंदा यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडत असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group