मेष : मेष राशीच्या लोकांसाठी आज चंद्र आणि मंगळाच्या गोचरमुळे सर्व बाबतीत लाभ मिळतील. चंद्र-मंगळ योगाने तुमचे मनोधैर्य वाढेल. नोकरीत तुम्हाला बुद्धिमत्ता, चातुर्य आणि तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल. व्यवसायात तुमची कमाई वाढेल. द्रव वस्तुंच्या व्यवसायात तुम्हाला लाभ होईल. सरकारी कामांमध्येही तुम्हाला नफा मिळू शकतो.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि सूर्याच्या योगामुळे दिवस फायद्याचा राहील. शुक्र आणि बुधाच्या राशी बदलामुळेही तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचे काम सुरळीत चालेल आणि तुम्हाला आपल्या कला कौशल्याचा फायदा होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. एखादी इच्छा पूर्ण होईल ज्यामुळे तुम्ही आनंदित व्हाल.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक योजनांमध्ये प्रगती करणारा राहील. चंद्र पंचम घरात आणि गुरू व शुक्र यांच्या योगाने तुमच्या मनोकामना सिद्ध होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात मजा आणि आनंद राहील. नोकरीत तुमचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. एखादी समस्या सुटल्याने मन प्रसन्न होऊ शकते.
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक प्रगती करणारा राहील. आपल्या राशीच्या बाराव्या घरात गुरु व शुक्र यांच्या योगामुळे खर्चही भौतिक सुखांवरच होईल. तरीही, तुमच्या वाणी व चातुर्याने व्यवसायात फायदा होईल. फ्रेंड्ससोबत मजा करण्यात वेळ जाईल. विरोधकांसोबत वादविवाद टाळावेत. आई सोबत तुमचा स्नेह व सहयोग राहील.
सिंह : सिंह राशीचा दिवस उत्साहवर्धक आहे. कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे तणाव राहील, त्यामुळे सावधगिरी बाळगा. विजेचे उपकरण किंवा वाहनावर खर्च होऊ शकतो. भावंडांसोबत वादविवाद टाळा. वडील व घरातील ज्येष्ठांकडून मदत मिळू शकते. प्रवास संभवतो. प्रिय व्यक्तीशी भेटीची शक्यता आहे.
कन्या:कन्या राशीसाठी दिवस चांगला राहील. मात्र आज वाणीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. लोक तुम्हाला आज जाणून घेऊ इच्छितात. कामावर लक्ष केंद्रित करा.. नोकरीत काही नवीन संधी मिळू शकतात. भाऊबहीणींकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातून चांगल्या वार्ता मिळू शकतात. शिक्षणात शिक्षक आणि मित्रांची साथ राहील. आर्थिक व्यवहारात भावनांना जपणे गरजेचे.
तुळ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी राहील. चंद्राचे गोचर तुमच्या राशीत असल्यामुळे मनात चंचलता वाढेल. कला आणि क्रिएटिव्हिटीमध्ये रुची वाढेल. विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य ठेवणं आवश्यक. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. जवळच्या नात्यातून अशी माहिती मिळू शकते, ज्यामुळे मनाला त्रास होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावं.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस खर्चीक राहील. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. द्वादश भावात चंद्र आणि पाचव्या घरात मंगळ असल्यामुळे, तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवावं. जोखमीच्या कामांपासून सावध राहा. विजेच्या उपकरणांपासून दूर रहा.
धनु : धनु लोकांसाठी गुरू आणि चंद्रच्या गोचराने शुभ परिणाम होईल. तुमची बुद्धिमत्ता वापरून काम पार पडेल. नोकरी सुरळीत चालेल. मित्रांची मदत मिळेल. आईशी आणि जवळच्या नातेवाईकांशी चांगलं वागा, बोलण्यावर कंट्रोल ठेवा. आईच्या तब्येतीवर लक्ष द्या. प्रेमसंबंधात भेटवस्तूची देवाणघेवाण होऊ शकते.
मकर : मकर राशीच्या लोकांसाठी दिवस कामात तेजी आणणारा राहील. अडचणीतल्या कामाला गती येईल. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश मिळू शकते. घरगुती वस्तूंच्या व्यवसायात लाभ होईल.कौटुंबिक जीवनात प्रेम व सहकार्य राहील. सासऱ्यांकडून मदत होईल. सायंकाळी आनंददायक वेळ जाईल. सामाजिक कार्यात भाग घेता येईल.
कुंभ : कुंभ राशीसाठी आज अनुकूल दिवस असेल. कामाचा ताण असेल पण मेहनत केल्याने कामात लाभ होईल. घरात बोलताना शब्दांची काळजी घ्या. कौटुंबिक सहकार्य व प्रेम राहील. नवीन तंत्रज्ञान शिकण्यावर भर द्या यामुळे भविष्यात फायदा होईल. संपर्क वाढेल. अनपेक्षित नफा होताना दिसत आहे. प्रेम संबंध दृढ होतील.
मीन : मीन राशीच्या लोकांसाठी आज करियर व कामकाज सामान्य राहील. टीमवर्कने टार्गेट पूर्ण करता येईल. आपली योजना आणि वागणे चांगले परिणाम देतील. घरगुती वस्तू व विजेच्या उपकरणांतातून लाभ मिळेल. पूर्व संपर्कातून फायदा होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूत राहील. पार्टनर सोबत रोमँटिक क्षण घालवू शकता.