अमेरिकेचा भारतीयांना मोठा धक्का ! थेट कारवाई अन...
अमेरिकेचा भारतीयांना मोठा धक्का ! थेट कारवाई अन...
img
Nandini khandare More

इराण अमेरिका तणावाणे संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. दरम्यान याचे विपरीत परीणाम अनेक देशांसह भारतावर देखील होत आहेत. दरम्यान आता भारतीयांना धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे. या समोर आलेल्या माहितीने सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. 

तब्बल 30 भारतीय लोकांना अमेरिकेत अटक करण्यात आली. ज्याने एकच खळबळ उडाली. एजन्सीचे म्हणणे आहे की, सर्व लोकांना डिपोर्ट केले जाईल. मिळालेली अधिक माहिती अशी की, हे सर्व भारतीय नागरिक व्यावसायिक ट्रकचालक म्हणून काम करत होते. कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि वर्जीनिया या राज्यात ट्रकचालक चालक म्हणून काम करत. या लोकांकडे जो बाइडन यांच्या काळातील रोजगार प्राधिकरणाचे कागदपत्रे मिळाली. ती अवैध आहेत. अमेरिकी कस्टम्स अॅन्ड बॉर्डर प्रोटेक्शनने याबाबत बोलताना म्हटले की, 11 आणि 15 मे रोजी युमा सेक्टरच्या बॉर्डरजवळ ऑपरेशन चेकमेट राबवण्यात आले. अमेरिकेमध्ये अवैध राहणाऱ्या 52 लोकांना यादरम्यान अटक करण्यात आली. ज्यामध्ये 36 लोक ट्रक चालवताना मिळाली.

अमेरिकेच्या एजन्सीने अटक केलेले 36 ट्रकचालकांपैकी 30 भारतीय नागरिक आहेत. एजन्सीने स्पष्ट सांगितले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांना लवकरच डिपोर्ट केले जाईल. एजन्सीने ऑपरेशन चेकमेटच्या माध्यमातून अमेरिकेत अवैध ट्रकचालक व्यक्तींची माहिती मिळून त्यांना अटक करून सार्वजनिक सुरक्षा वाढवली जातंय.

आपल्या समाजात असे सीन्स..; कंगना राणौत यांच्या 'त्या' चित्रपटावर आईने व्यक्त केलेली नाराजी, पुन्हा कधीच विचारलं नाही मत
ऑपरेशन चेकमेट हे सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर चालकांपासून समुदाय आणि रस्त्यांचे संरक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करते. अमेरिकेकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. आता त्याचा फटका सर्वांनाच बसताना दिसतोय. त्यामध्येच सर्वात अगोदर भारतीय लोकांवर कारवाई केली जात आहे.

अमेरिका मागील काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात सतत बदल करत आहे. अमेरिका फस्ट हे त्यांचे धोरण आहे. H1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल केले. याचा थेट परिणाम भारतीयांवर झाला. फक्त हेच नाही तर थेट भारतीय लोकांना मोठ्या प्रमाणात मायदेशी पाठवले जात आहे. त्यामध्येच आता ही एक अत्यंत मोठी कारवाई करण्यात आली. जर H1B व्हिसा हवा असेल तर त्याकरिता मोठे पैसे मोजावे लागत आहेत. अमेरिकेच आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर खास करून याचा परिणाम होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group