नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट !  'त्या' तीन मुलांनी साक्ष,अन ....नेमकं काय घडल ?
नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट ! 'त्या' तीन मुलांनी साक्ष,अन ....नेमकं काय घडल ?
img
Nandini khandare More


पुण्यातीलनसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केलेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात नवं नवीन खुलासे होत असून आता याच प्रकरणातील  एक मोठी बातमी अपडेट समोर आली आहे

 प्रकरणाच्या सुनावणीत आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीवर न्यायालयात दोष निश्चिती करण्यात आली असून, सुनावणी दरम्यान तीन लहान मुलांनी कोर्टात अत्यंत निर्भीडपणे साक्ष दिल्याचे समोर आले आहे. या साक्षींमुळेच नसरापूरच्या नराधमाचा खेळ खल्लास झाला असल्याचे म्हटले जात आहे.

घटनेच्या दिवशी तीन लहान मुले त्याच परिसरात खेळत होती. नराधम आरोपी पीडित चिमुकलीला गोठ्याशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात असताना या मुलांनी पाहिले होते. मुलांनी गोठ्याच्या फटीतून पाहिले असता त्यांना आरोपी संशयास्पद स्थितीत दिसला. आपल्याला कोणीतरी पाहत असल्याचा सुगावा लागताच आरोपीने त्या लहान मुलांवर दगडफेक देखील केली होती. दगड लागल्यामुळे मुले तेथून पळून गेली, मात्र त्यांनी हा संपूर्ण थरारक घटनाक्रम आणि आरोपीचा चेहरा मनात पक्का केला होता.

विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडदरम्यान आणि न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर असलेल्या आरोपीला या तिन्ही बालकांनी स्पष्टपणे ओळखले आहे. कोर्टात त्यांनी कोणतीही भीती न बाळगता प्रत्यक्षदर्शी म्हणून दिलेली साक्ष या खटल्यात आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदारांपैकी १६ प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदवून झाली आहे.

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षांच्या एका वृद्ध नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने चिमुकलीला दगडाने ठेचून निर्घृणपणे मारले आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली. सीसीटीव्ही आणि आता या तीन मुलांच्या साक्षीमुळे नराधमाचे पाप कोर्टासमोर पूर्णपणे उघडे पडले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group