आजकाल विवाहबाह्य संबंधातून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. या प्रकरणांमधून हत्या , आत्महत्या यासारखे गंभीर घटना उघडकीस येत आहेत. दरम्यान आता सोलापुरात अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडलीय.
सोलापूर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने टोकाचा निर्णय घेत राहत्या घरात गळफास घेतला. इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील या घटनेनं खळबळ उडाली होती. आता आत्महत्येपूर्वीचा जवळपास 6 मिनिटांचा व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला असून यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचं पुढं आलंय. जाकीर अब्दुल रजाक पटेल असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जाकीर पटेल हे शहरात सेंट्रिंगचे काम करत होते. मंगळवारी सकाळी त्यांचा पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय घेत घरातील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसाठी एक व्हिडिओ संदेश तयार केला होता. ज्यात त्यांनी मनातील वेदना आणि आत्महत्येस कारणीभूत परिस्थितीचा उलगडा केला असून मृताच्या नातेवाईकांनी पत्नी आणि संबंधित व्यक्तीवर ई
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागला
मिळालेल्या माहितीनुसार, जाकीर यांच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबाबत त्यांनी पत्नीला जाब विचारला. त्यावरूनच पती-पत्नीत वाद झाला होता. पत्नीशी संबंध असणाऱ्या व्यक्तीने सर्वांसमोर जाकीर यांना चापट मारली होती. अपमान सहन न झाल्याने जाकीर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
व्हिडिओत काय?
जाकीर यांनी आत्महत्येपूर्वी पत्नीसाठी व्हिडिओ केला. “मी तुला फ्री करतोय, मी तुला आझाद करतोय. आता तुला बोलायला आणि आडवायला कोणी नसणार आहे. मी तुला खूप समजावलं, परंतु, तू कधीच ऐकलं नाही. त्यामुळे मी आज हे पाऊल उचलतोय. आधीही मी सांगितलेलं त्याला नको फोन करू. वारंवार समजावलं पण तू ऐकलं नाही. फोन करत होती, तू सगळ्यांच्या आयुष्याची वाट लावली,” असे बोलताना जाकीर पटेल दिसत आहेत.