शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का ! जिल्हाप्रमुखांचा राजीनामा
शिवसेना ठाकरे गटाला अत्यंत मोठा धक्का ! जिल्हाप्रमुखांचा राजीनामा
img
Nandini khandare More

राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला. अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता नरेंद्र पडोळे बच्चू कडू यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे काम करणार आहेत. नरेंद्र पडोळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा अत्यंत मोठा झटका नक्कीच उद्धव ठाकरे गटाला म्हणावा लागणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. हा अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का म्हणावा लागेल.

बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळी या भागात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा होती. आता तेच खरे होताना दिसत आहे. शिवाय बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ज्यावेळी प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पडोळे प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राजीनामाचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.

पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून नरेंद्र पडोळे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगतंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच अमरावतीत ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. नरेंद्र पडोळे यांच्याकडे अचलपूर ,मेळघाट विधानसभा क्षेत्राची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group