तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट ? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय
तृणमूल काँग्रेस पक्षात उभी फूट ? ममता बॅनर्जींचा तडकाफडकी मोठा निर्णय
img
Nandini khandare More


सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात फुट पडण्याच्या शक्यतेबाबत विविध राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पक्ष नेतृत्वाने काही आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर या चर्चांना आणखी उधाण आले आहे. त्यामुळे आगामी काळात तृणमूल काँग्रेससमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या ममता बॅनर्जी यांनी आपल्या ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा या दोन आमदारांना पक्षातून काढलं आहे. त्यानंतर जवळपास ५९ पेक्षा जास्त आमदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भाजपादेखील अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते तथा बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत तृणमूलच्या 18 आमदारांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे आता तृणमूलची शकलं करण्यासाठी भाजपादेखील सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या 80 आमदारांपैकी 59 आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या पाठीमागे राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य फूट लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनीही मोठं पाऊल उचललं आहे. त्यांनी पक्षातील सर्व समित्या आणि इतर संघटना बरखास्त केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने मोठ्या विचाराअंती पक्षाच्या सर्व संघटना, त्यावरील नियुक्त्या बरखास्त केल्या आहेत, असे सांगितले आहे. लवकरच आम्ही र्वसमावेशक आत्मपरीक्षण, कामगिरीचा आढावा आणि संघटनात्मक मूल्यांकन करू आणि संघटनांची पुनर्रचना करू, असे सांगण्यात आले आहे. हा निर्णय घेऊन आता ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे सर्व अधिकार आपल्याकडेच घेतल्याचे बोलेल जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group