सध्या इराण आणि अमेरिकेच्या तणावाने संपूर्ण जगाला वेठीस धरले असून देशात महागाईने डोकं वर काढलं आहे तर दुसरीकडे आता युद्धात तेलाच्या मोठे संकट आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्लीमध्ये महत्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाची झाली. यादरम्यानच आता केंद्र सरकारने तेलाच्या संकटात मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारने थेट मोठा निर्णय घेत 10 लाख कोटी रूपयांचा निधी जारी केला आहे. ही अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे. कच्च्या तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता या निधीची घोषणा करण्यात आली.
सरकारकडून अत्यंत मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता विविध निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत. त्यामध्येच ही अत्यंत मोठी घोषणा केली. यापूर्वी अनेक देशांच्या दाैऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यांनी तेलासंदर्भात काही मोठे करार देखील केले. युद्धाच्या स्थितीमध्ये जगभरात कच्च्या तेलाची तुटवडा निर्माण झाला.
इतर देशाच्या परिस्थितीमध्ये भारताची स्थिती अत्यंत चांगली आहे. या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल. याकरिता सरकार प्रत्येक प्रयत्न करत आहे. होर्मुज खाडीतील स्थितीवर भारताची नजर आहे. काही काही जहाज होर्मुज खाडीतून भारताची सोडली जात आहेत. होर्मुज खाडीत भारताचे अजूनही 13 जहाज अडकून बसल्याची माहिती मिळत आहे. सध्याच्या घडीला भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे.