संतापजनक ! कॉलेज तरुणीवर प्रियकरासह चौघांकडून अत्याचार
संतापजनक ! कॉलेज तरुणीवर प्रियकरासह चौघांकडून अत्याचार
img
Nandini khandare More
 महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान आता अशीच एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी आता कोल्हापूर मधून समोर आली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर चार जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. 

अधिक माहिती अशी की, आरोपींनी पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर  जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राधानगरी येथील चार तरुणांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी एकजण पिडीत मुलीचा प्रियकर होता. सर्वात आधी आदित्य शेटके याने पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. यानंतर या चारही जणांना मुलीवर अनेकदा बळजबरी करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या चार संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. 

आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती. काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आदित्याने पिडीत तरुणीशी शारीरिक जवळीक करुन तिचे व्हिडीओ चित्रित करुन तिचा गैरफायदा घेतला. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची चौकशी आणि अन्य तपास सुरु आहे. त्यामधून आता कोणती नवी माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group