आज दिल्लीत अत्यतं दुर्दैवी घटना घडली असून हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची वास्तविकता अत्यंत भयावह असून ही घटना अत्यतं दुर्दैवी आहे. दिल्लीच्या लेमन ग्रीन इन रेस्टॉरंटसह पाच मजली फ्लोरीश स्टे बी अँड बी हॉटेलला भीषण आग लागली. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी 100 लोक आत होती. 21 जणांचा या आगीत मृत्यू झाला. तर आता ४० पेक्षा जास्त लोकं गंभीर आहेत. याचदरम्यान या आगीची भयंकर आपबीती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार , ही आग लागल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी बाल्कनीतून उड्या घेतल्या. काहींनी थेट स्वत:चा जीव वाचवण्याकरिता बाथरूममध्ये पळ काढला. बाथरूममध्ये अनेकजण लपून बसली.मात्र आग कमी व्हायची सोडून काही वेळात अधिक भीषण झाली. आगीचा भडका उडाला. बचावकार्य पोहोचूपर्यंत जवळपास सर्वच संपले होते. बचावकार्यात 40 लोकांना बाहेर काढण्यात आले. 21 जणांचा या आगीत मृत्यू झाला. यादरम्यानच आता अत्यंत हैराण करणारी माहिती या आगीबाबत येत आहे. उपस्थितांनी या आगीच्या घटनेनंतर धक्कादायक खुलासा केला.
एका स्थानिक नागरिकाने म्हटले की, आमच्या जीवाची पर्वा न करता आत गेलो. आम्ही खालचा भाग तोडून 7 ते 8 लोकांना बाहेर काढले. धुरामुळे अनेक जण गुदमरत होते. मी माझ्या पाठीवर घेत काहींना बाहेर काढले. अजून एका रहिवाशाने आगीच्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, आग इतकी भडकली होती की, कोणीही आत जात नव्हते. लोक उड्या मारत होते, यादरम्यान रहिवाशांनी रस्त्यावर गाद्या टाकल्या होत्या.
अरुंद जिन्यामुळे जे खिडकीतून उडी मारू शकले नाहीत, ते स्वतःला वाचवण्यासाठी बाथरूमकडे धावले. बचाव पथकांना बाथरूममध्ये जळालेल्या आणि गुदमरून जागीच जीव सोडलेल्या लोकांची मृतदेह मोठ्या प्रमाणात आढळली. ही भयानक दृश्य होते. 6 रूमची परवानगी असताना तब्बल 25 रूम या हॉटेलमध्ये असल्याचाही आरोप केला जात आहे.