'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन' धमकी;  लाच घेताना पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात
'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन' धमकी; लाच घेताना पोलीस अंमलदार ACB च्या जाळ्यात
img
Nandini khandare More


राज्यात सध्या भ्रष्टाचाराच्या अनेक घटना सध्या घडत असून सरकारी कार्यालय, प्रशासकीय खात्यात, पोलीस खात्यात या घटना सतत उघडकीस येत आहेत. दरम्यान आता अशीच एक घटना आता उघडकीस आली असून  एक पोलीस अंमलदार लाच घेताना  ACB च्या जाळ्यात सापडला आहे. 

अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांचे विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून दहा हजार रुपये स्वीकारताना पोलिस अमलदाराला रंगेहात पकडले आहे. बीडच्या नेकनुर पोलीस स्टेशनमधील अंमलदार दत्तात्रय बळवंत याला जालना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे, यामुळे खळबळ उडाली असून बीडमध्ये लाचखोरीच्या घटना थांबणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. याच वादग्रस्त दत्तात्रय बळवंत यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी दिली होती त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

एका अपघातात तक्रारदाराचे वडील मयत आहेत त्यांचा विम्याचा दावा कोर्टात करण्यासाठी पोलीस स्टेशनकडून दिले जाणारे कागदपत्र मिळावे यासाठी तक्रारदाराने वारंवार मागणी केली. यावेळी कागदपत्र देण्यासाठी पंधरा हजाराची मागणी केली तडतोडअंती दहा हजार देण्याचे ठरले. दहा हजार रुपयांची लाच आज स्वीकारताना बळवंत याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी पवनचक्की लाईन उभारणी करत असताना शेतीच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका शेतकऱ्याच्या मुलास तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनुर पोलीस ठाणे चर्चेत आले आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group