बर्निंग ट्रेनचा थरार ! स्टेशनवर  पोहोचताच इंजिनला  भीषण आग, प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या
बर्निंग ट्रेनचा थरार ! स्टेशनवर पोहोचताच इंजिनला भीषण आग, प्रवाशांनी खिडक्या-दारातून मारल्या उड्या
img
Nandini khandare More
ट्रेनला भीषण आग लागल्याच अनेक घटना अनेकदा घडल्या आहते. दरम्यान आता अशाच एका बर्निंग ट्रेनचा थरार बिहार मध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर भल्या पहाटेच आगीची भीषण घटना घडली. समस्तीपूर-सहरसा (६३३४४) पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनला पहाचे तीन वाजताच्या आसपास अचानक भीषण आग लागली.

पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले आणि धुराचे लोट थेट ट्रेनच्या डब्यांपर्यंत पोहोचले. इंजिनसोबत आगीची धग चार ते पाच डब्ब्यांपर्यंत पोहचली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशी प्रचंड घबरले आणि जीव वाचवण्यासाठी खिडक्या व दारांतून बाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली.

आगीची माहिती मिळताच स्टेशन परिसर आणि रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. सुदैवाने प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमरी बख्तियारपूर स्टेशनवर पॅसेंजर ट्रेन पोहोचताच इंजिनमधून धूर निघू लागला. ही आग झपाट्याने तीन डब्यांमध्ये पसरली. आगीची दुर्घटना घडली त्यावेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत होते. पण सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

आग आणि धुराची माहिती मिळताच ट्रेनमध्ये घबराट पसरली. प्रवासी ट्रेनला आग लागल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रवासी तात्काळ खाली उतरू लागले. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून बाहेर पडू शकले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ), स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक सकाळी ६ वाजल्यानंतर पुन्हा सुरू झाली. रेल्वे अधिकाऱ्यांनी अद्याप आगीचे कोणतेही कारण दिलेले नाही. या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. तपासानंतरच आग कशी लागली, याबाबतचे कारण समोर येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group