तळीरामांना झटका ! ''या'' लोकप्रिय मद्य विक्रीवर बंदी ?
तळीरामांना झटका ! ''या'' लोकप्रिय मद्य विक्रीवर बंदी ?
img
Nandini khandare More
तळीरामांसाठी झटका देणारी एक बातमी समोर आली आहे . आता गटारी जवळ येत आहे. त्याआधी घावनाय्त आलेला हा निर्णय तळीरामांना धक्का देणारा आहे. 

समोर आलेलया माहितीनुसार , फूड सेफ्टी रेग्युलेटर FSSI ( भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ) या संस्थेने ओल्ड माँक, एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स सारख्या नामवंत मद्याच्या ब्रँडच्या काही व्हेरिएंट्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या पावलामागे या मद्यात आर्टिफिशियल फ्लेवर आढळले असून ते मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्ड्सच्या नुसार नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहै.

फ़ूड सेफ्टी एँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( FSSAI ) ने काही भारतीय मद्याच्या ब्रँडवर कारवाई केली आहे. यात डियाजिओ इंडियाच्या युनायडेट स्पिरिट्स, इनब्रु बिव्हरेजेस आणि मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर द्वारा तयार करण्यात आलेल्या काही उत्पादनात मद्याचा सारखा स्वाद आणि सुंगध आणण्यासाठी बाहेरुन आर्टिफिशियलस वा नेचर आयडेंटिकल फ्लेवरचा वापर केला गेला होता. वास्तविक यात मद्याची निर्मिती करताना नैसर्गिक सामुग्री आणि योग्य प्रकारचे मॅच्युअर करण्याच्या प्रक्रियेचा वापर केला जाणे गरजेचे होते.


कोठे लावली विक्रीवर बंदी ?
या नियामक संस्थेने मध्य प्रदेशाताली युनायटेड स्पिरिट्सने तयार केलेल्या एंटीक्विटी ब्ल्यू व्हिस्की आणि रॉयल चॅलेंज व्हिस्की, इनब्रु बिवरेजेसने तयार केलेली बॅगपायपर डिलक्स व्हिस्की आणि ओल्ड कास्क डिलक्स XXX रमच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय महाराष्ट्रात मोहन रॉकी स्प्रिंगवॉटरने तयार केलेली ओल्ड माँकच्या तीन व्हेरिएंटवर निर्बंध लागू केले आहे. ही बंदी येथे खास तयार झालेल्या प्रोडक्ट्सवर लागू असेल की अन्य जागी तयार झालेल्या याच ब्रँड्सवरही देखील लागू असणार याबाबत स्पष्टीकरण झालेले नाही.

लॅबमध्ये धक्कादायक खुलासा
नियामक संस्थेच्या मते भारतात खाद्य सुरक्षा नियम मद्यासारख्या पेयात नैसर्गिक फ्लेवरिंग पदार्थांना मिक्स करण्याची परवानगी देतात. मात्र, FSSAI च्या लॅबोरेटरीत केलेल्या कंपनीच्या काही ब्रँडच्या मद्यात कुत्रीम फ्लेवर मिक्स केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. उदा. रमच्या बाटलीच रमचा कृत्रिम फ्लेवर, व्हिस्कीच्या बाटलीत व्हिस्कीचा कृत्रीम फ्लेवर मिक्स केल्याचे उघडकीस आले आहे. भारतात अशा प्रकारे मद्यात फ्लेवर वापरण्यास परवानगी नाही.

भारत हा जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारापैकी एक आहे. येथील मद्य उद्योगात वार्षिक महसुल सुमारे ४० अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. मार्केटच्या हिशेबाने युनाएटेड स्पिरिट्सच्या द्वारे डिपाजिओ इंडिया देशातील सर्वात मोठी मद्य निर्मिती कंपनी आहे. आणि ही फ्रान्सची स्पिरिट कंपनी पेरनोड रेकॉर्डला टक्कर देते. FSSAI ची कारवाईच्या घेऱ्यात येणारे ब्रँडचे मद्य देशात तयार झालेले आहेत. त्यांची किंमत इम्पोर्टेट व्हिस्की, स्कॉच आणि प्रिमियम रमच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांची मागणी जास्त असते. ही कारवाई या क्षणी झाली आहे जेव्हा FSSAI संस्थेने खाद्य आणि आहाराची जास्त काळजीपूर्वक तपासणी सुरु केली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group