सध्या सोशल मीडियावर एक अंगावर शहारे आणणारा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका तरुणाने केवळ काही सेकंदांचे 'शायनिंग' मारण्यासाठी जीवाशी खेळल्याचे दिसून येत आहे. धावत्या लोकल ट्रेनला लटकण्याचा प्रयत्न केल्याने तो थेट ट्रेनच्या खाली गेला आणि चक्क २ किलोमीटरपर्यंत फरफटत गेला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत , एक व्यक्ती धावत्या ट्रेनला लटकलेला आहे. अन्य प्रवासी ट्रेनच्या खिडकीतून त्याला पाहत आहे. कोणीही त्याला वाचवण्याच्या प्रयत्ना दिसत नाही. जिवाच्या आकांताने तो व्यक्ती स्वत:ला धावत्या ट्रेनच्या खाली येण्यापासून वाचवत आहे. पण अखेरीस तो व्यक्ती ट्रेनच्या खाली येतो. सर्व धक्कादायक प्रकार ट्रेनमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
आजकाल तरुण पिढीमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. लाखो व्ह्यूजसाठी, काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी ते जीवाची पर्वा न करता स्टंट करताना दिसतात. अशा अनेक घटनांमध्ये आधीही अनेक तरुणांनी आपले प्राण गमावले आहेत.
हा प्रकार त्याचाच एक थरारक आणि चिंताजनक नमुना म्हणावा लागेल. ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. पण त्याचा सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. @absyy_crazy या एक्स (ट्वीटर) अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.