रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल ; नेमकं प्रकरण काय?
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल ; नेमकं प्रकरण काय?
img
DB
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहेत. यावेळी सत्तेत आल्यानंतर काय काय केलं जाईल याबाबतची आश्वासनं महायुती आणि महाविकास आघाडीकडून मतदारांना दिली जात आहेत.दरम्यान उमेदवार आणि राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये तसेच चित्रफिती समोर येत आहेत.अशातच रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काहीसा दुरावा निर्माण झाला होता. मात्र रावसाहेब दानवे यांच्या एका व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात पॅचअप झाल्याचे दिसतंय. 

सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीतील नेते एकमेकांचा प्रचार करताना दिसताय. अशातच रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचे पाहायला मिळतंय. 

या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर रावसाहेब दानवेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. तर काहिंनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. रावसाहेब दानवे हे राज्यातील राजकीय वर्तुळातील एक प्रभावी व्यक्तीमत्तव मानंल जातं मात्र आता त्यांच्या अशा या कृत्यानंतर रावसाहेब दानवे चांगलेच चर्चेत आले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group