अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका राज्यस्तरीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुस्तीपटूला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिची प्रकृती अधिक बिघडत चालली. नातेवाईकांनी तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुस्तीपटूच्या अकाली निधनानंतर क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. प्राप्ती सुरेश विघ्ने (वय वर्ष २२) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील रहिवासी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तीला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिने आपल्या भावाला फोन करून “मी घरी येत आहे” असे सांगितले. भावाने तिला सकाळी अमरावतीहून घरी आणले. घरी विश्रांती घेत असतानाच अचानक तिची प्रकृती अधिकच बिघडली.
प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मृत घोषित केल्यानंतर तरूणीच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला.
दररोज व्यायाम करणारी, अतिशय तंदुरुस्त आणि राज्यस्तरावर कुस्ती खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूच्या अकाली निधनानंतर अनेक क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.