पिकांचे नुकसान करणाऱ्या जनावरांबाबत मोठा निर्णय
पिकांचे नुकसान करणाऱ्या जनावरांबाबत मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
अमरावती : रोही व रानडुकराने शेतमालाचे नुकसान केल्यास वनविभागाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. परंतु रोही व रानडुकराचा कायमचा बंदोबस्त करता येत नव्हता. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्राण्यांना मारण्याचे अधिकार नव्हते.

परंतु राज्याच्या महसूल व वनविभागाकडून रोही व रानडुकरांकडून शेतमालाचे नुकसान झाल्यास व शेतकऱ्यांनी अर्ज केल्यास त्यांना ठार मारण्याकरिता २४ तासांच्या आत परवानगी दिली जाणार आहे. यापूर्वी बंदुकीद्वारे शिकार करण्याकरिता अनुभवी व्यक्ती मिळत नव्हती.

रोही व रानडुक्कर ठार झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत होता. वनपरिक्षेत्र अधिकारी यांना वन्यप्राणी विल्हेवाट करण्याबाबत अधिकार नव्हते. त्यामुळे ठार करण्याची सदर कार्यपद्धती व्यवहारी ठरत नसल्याचे वनविभागाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली. 

रानडुक्कर किंवा रोही या वन्यप्राण्याने शेतातील पिकांचे नुकसान केले. याबाबत शेतकऱ्याने संबंधित वनक्षेत्रपालांकडे लेखी स्वरूपात अर्ज देऊन त्याची पोचपावती घ्यावी लागणार आहे. 

तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित वनक्षेत्रपाल शहानिशा करतशेतमालाचे नुकसान करणाऱ्या रोही व रानडुकराला मारण्याकरिता २४ तासांच्या आत परवानगी देणार आहे जर २४ तासांच्या आत परवानगी दिली नाही किंवा नाकारली नाही तर अर्जदाराला परवाना दिला, असे गृहीत धरले जाणार आहे.

संरक्षित जंगलात मात्र परवानगी नाहीराष्ट्री य उद्याने, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, संबंधित राखीव क्षेत्रात मात्र कोणत्याही वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी दिली जाणार नाही. अभयारण्य राष्ट्री य उद्यान सीमेपासून पाच किलोमीटर सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदीचा वापर करताना - अधिक काळजी घेतली जाणार आहे.

ठार करण्याच्या परवानगीसाठी लागणारा व्यावहारिक कालावधी व क्षेत्र याचा तपशील नमूद करण्यात येईल. परवानाधारकाने त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

प्रत्येक महिन्यात देण्यात आलेले परवाने, त्यानुसार ठार करण्यात आलेले रोही व रानडुक्कर यांच्या संख्येबाबत विल्हेवाट तपशील, मासिक अहवाल वनक्षेत्रपाल संबंधित उपवन संरक्षकाकडे देणार आहेत. यामुळे वन्यप्राण्यांकडून शेतातील - पिकांची नासाडी होणार नाही, असे मानले जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group