मोठी दुर्घटना : ३०० कर्मचारी लंच करत असाताना भीषण स्फोट, फार्मा कंपनीत
मोठी दुर्घटना : ३०० कर्मचारी लंच करत असाताना भीषण स्फोट, फार्मा कंपनीत
img
Dipali Ghadwaje
अमरावती : आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मा कंपनी प्लांटमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३३ हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका भीषण होता की इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला. स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी अशी माहिती दिली की, एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक घाबरले. पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.

 पहा व्हिडीओ -



नेमकं काय घडलं? 

कारखान्यात ३८१ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. दुपारी जेवणाच्या सुट्टीत हा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. हा स्फोट विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातातील जखमींना अनकापल्ली आणि अच्युथापुरम येथील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group