वॉटर पार्कमध्ये रंगली तरुण तरुणींची ओली पार्टी, पोलिसांच्या धाडीत ४५ जणांना अटक
वॉटर पार्कमध्ये रंगली तरुण तरुणींची ओली पार्टी, पोलिसांच्या धाडीत ४५ जणांना अटक
img
Dipali Ghadwaje
अमरावती : पुण्यातील हिट अँड रन केस प्रकरणानंतर शहरातील पब, बार आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या पार्ट्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील एका रिसॉर्टवर मध्यप्रदेश पोलिसांनी धाड टाकली असून ३४ पुरुष आणि ११ महिलांना अटक करण्यात आली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरावती जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या एका रिसोर्टवर मध्यप्रदेश पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईमध्ये अश्लिल नृत्य करताना नागपुरमधील महिलांना पकडण्यात आले. या धडक कारवाईमध्ये तब्बल ३४ पुरुष आणि ११ महिलांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या वरुडपासून काही अंतरावर मध्यप्रदेशच्या जंगलात हे नेचर प्राईड रिसोर्ट आणि वॉटर पार्क आहे. या रिसोर्टवर मध्यप्रदेशच्या मूलताई पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. अश्लिल नृत्य, धिंगाणा, मोठ्या आवाजात डीजेवर गाणी असा प्रकार या रिसोर्टमध्ये सुरू होता. यावेळी एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली.

या रिसोर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी अटक केल्या आरोपींमध्ये अमरावती जिल्ह्यातील वरुडमधील दोन आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पुण्यातील पब संस्कृतीविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता विदर्भामध्ये उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत..
इतर बातम्या
Join Whatsapp Group