लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हफ्ता कधी जमा होणार याविषयीची ही मोठी आपेट आली असून पुढील आठवड्यात गणपती विसर्जनाच्या काळात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यातील पात्र १ कोटी ६६ लाख महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यांचा हप्ता जमा होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, माहिती संभाव्य अपडेट म्हणून पाहावी.
गौरी-गणपतीच्या सणाचे औचित्य साधून ऑगस्ट महिन्याचा निधी महिलांच्या खात्यावर जमा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय कामांमुळे ही वेळ थोडी पुढे ढकलली गेली आहे. आता महिला व बाल विकास मंत्रालयाकडून निधी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून थेट बँक खात्यात (DBT द्वारे) हे पैसे जमा केले जाणार आहेत.
२४ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात २४ सप्टेंबरनंतर राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. हे पैसे टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर वर्ग केले जातील. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनावेळी लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा निधी दिला होता. आता गौरी गणपतीत १५०० खात्यावर येईल, असे म्हटले जात होते. पण ऑगस्ट महिन्याचा निधी हा पुढील आठवड्यात २४ तारखेनंतर जमा होऊ शकतो.
१ कोटी ६६ लाख महिलांना मिळणार दिलासा या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे. याआधी जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचे औचित्य साधून देण्यात आला होता. आता सणासुदीच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी हे १५०० रुपये मिळणार असल्याने राज्यातील महिला वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.