महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, ''पाहा'' नवी अपडेट
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, ''पाहा'' नवी अपडेट
img
दैनिक भ्रमर

राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेसाठी अर्ज केला आहे. अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले देखील गेले आहेत. असं असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून येत्या 17 ऑगस्टला 3 हजार रुपये मिळणार आहेत.  विशेष म्हणजे पुढचे सहा महिने सलग महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये निश्चित जमा होणार आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

 राज्य सरकारकडून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे किती दिवस मिळणार? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पण राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना पुढचे 6 महिने तरी टेन्शन नाही. कारण त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत ही कमीत कमी सहा महिने तर शंभर टक्के मिळणार आहे.

“लाडकी  बहीण योजनेसाठी 46 हजार कोटी वर्षाला लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. 17 तारखेचा पहिल्या हप्त्याचा निधीसह पुढचे सहा महिन्यांचा निधीची तरतूद केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल”, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

तसेच , “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित झाल्यापासून या योजनेचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय. लाखोंच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्याअर्थी त्यांनाही योजना आवडलेली आहे. या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे. कुठल्याही दुसऱ्या योजनेवर लाडली बहीणमुळे अजिबात परिणाम पडलेला नाही”, अशीदेखील माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

“अन्नपूर्णा योजनेसहीत मोफत शिक्षण सारख्या योजनांचे जीआर शासनाने काढले आहेत. त्यामुळे या योजनेचा दुसऱ्या योजनांवर अजिबात नकारात्मक परिणाम पडलेला नाही. लाडकी बहीण योजनेमुळे चालू असलेल्या योजना किंवा नवीन योजनांवर अजिबात नकारात्मक परिणाम पडणार नाही. तसेच ज्यावेळी अर्थमंत्री एखादा योजना घोषित करतात तेव्हा निधीची तरतूद करूनच घोषणा करतात. साडेबारा कोटी जनता ते राज्याचा बजेट पाहते, खोटे आश्वासन त्यामध्ये देता येत नाही”, असं अदिती तटकरे यावेळी म्हणाल्या.

“विरोधकांना लाडकी बहीण योजनेचा विरोध करायचे म्हणून ते विरोध करत आहेत. मात्र ज्या अर्थी जनतेचा प्रतिसाद महायुतीच्या योजनांना मिळत आहे, त्यामुळे योजनांना विरोध करण्याचा अपयशी प्रयत्न विरोधक करत आहेत. जे योजनांवर टीका करत आहेत तेच त्यांच्या मतदारसंघातील सर्वात जास्त नोंदणी करून घेत आहेत. त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका विरोधकांकडून पाहायला मिळत आहे. मात्र जनता या भूलथापांना बळी पडणार नाही”, अशा शब्दांत अदिती तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group