लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
img
Jayshri Rajesh
राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी गर्दी होत आहे.अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकिय अधिकार्‍यांकडून लाभार्थी महिलांची आर्थिक लुट केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

या प्रकरणाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहे.  

 राज्यात कारवाईच आदेश

अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळकेला निलंबित करण्यात आले आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. राजेश शेळके हे शहरातील मोठी उमरी भागाचे तलाठी आहेत. 

मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू असतांना हा प्रकार घडला होता.अमरावतीनंतर अकोल्यात लाडकी बहीण योजनेत पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. सरकारने दिलेले कारवाईच्या सक्त आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अमरावतीतील वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमीसमोर आली होती. याची दखल घेत  अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन  करण्यात आले आहे. 

मंडळ अधिकारी संजय मिरासे यांच्या फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी पन्नास रुपये मागितले होते. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता अमरावतीत योजनेतील बहिणीकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणात राज्यातील पहिला गुन्हा अमरावतीच्या वरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group