लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या तटकरे?
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.