राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा महिलांना होत आहे , काही महिलांना याचा लाभ मिळाला आहे तर काही महिला अजूनही या योजनेपासून वंचित आहे. दरम्यान ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक इशारा दिला आहे . ऐपत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी हा इशारा अजित पवार यांनी दिला आहे .
या योजनेचा फायदा घेऊन एका दाम्पत्याकडून तब्बल 26 अर्ज भरण्यात आले. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवून जेलमध्ये चक्की पिसायला लावणार, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
“पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहिणी योजनेचे अर्ज मंजूर झाले आहेत. यामधे खेड तालुक्यात १ लाख ३ हजार अर्ज मंजूर झाले आहेत. एका महिलेला एका योजनेचाच लाभ घेता येणार आहे. एका नवरा बायकोने २६ नावे दाखविली. आम्हाला बांबू लावायचे काम करत आहेत. आमची द्यायची दानत आहे. तुम्ही लाभ घ्या. पण ऐपत असताना असं कराल तर कायद्याचा बडगा दाखवत चक्की पिसिंग करायला लावणार”, असा इशारा अजित पवारांनी दिला. ते खेडमध्ये कार्यक्रमात बोलत होते.