मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार लाडक्या बहिणींची भेट, काय आहे कारण ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार लाडक्या बहिणींची भेट, काय आहे कारण ?
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजने विषयी नवीन अपडेट आली आहे , या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीची भेट घेणार आहेत.  दरम्यान , आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  निवडणूक काही महिन्यांवर असताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यामध्येही जमा झाला आहे. तसेच अनेक महिला अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. 

दरम्यान , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहीरात करण्यात आल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा होऊ लागली. अजित पवार एकटेच या योजनेचं श्रेय घेत असल्याचा दावा महायुतीच्या इतर नेत्यांकडून करण्यात आला. यावरुन मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. अर्थात या वादावर आता पडदा पडला आहे. पण यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षही निवडणुकीच्या घोषणेआधीच लाडकी बहीण योजनेच्या प्रचारात उतरला आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी नव्या योजनेची देखील घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंबभेट ही योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शिवसेनेच्या राज्यभरतील पदाधिकारी हे रोज 15 कुटुंबांना भेटून मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा आढावा घेणार आणि ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्या कुटुंबाला ती योजना कशी मिळणार यासंदर्भात मदत करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वःतच उद्या 15 कुटुंबांना भेट देऊन माहिती घेणार आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटींगद्वारे बैठक घेतली. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group