'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांनी घेतला
'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अजित पवारांनी घेतला "हा" मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
महाराष्ट्रामध्ये सध्या राज्य सरकारने सुरु केलेल्या 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना 'सर्वाधिक चर्चेत असून  या योजनेवर अनेक मुद्द्यांवरून  सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. असं असतानाच आता या योजनेच्या नावावरुन अजित पवार आणि सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण आहे अजित पवार गटाने आपल्या जनसन्मान यात्रेआधी परस्पर या योजनेच्या नावामध्ये बदल केला आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातील असं जाहीर करण्यात आलं. अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जाहीर केलं. यावरुन बराच वाद झाला. हा पैसा नेमका उभा कठून आणि कसा करणार याबद्दल विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मात्र यावर सरकारकडून सविस्तर स्पष्टीकरण स्वत: अजित पवारांनी दिलं. या योजनेवरुन होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सर्व सत्ताधारी पक्ष एकत्र आल्याचं दिसून आलं असलं तरी आता याच योजनेच्या नावावरुन सत्तेत असलेल्या अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. 

अजित पवारांची जनसन्मान यात्रा 8 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या यात्रेच्या जाहिरातीचे पोस्टर्स नुकतेच समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये अजित पवार मोठ्या आकाराचा नमस्कार करताना फोटो दिसत असून त्या खाली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ आधी ज्येष्ठ नेत्यांचे फोटो दिसत आहेत. त्या खालोखाल या यात्रेच्या पोस्टवर 'लाडकी बहीण योजने'ची जाहीरात करण्यात आली असून दर महिन्याला प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले जातील असं बसवर लिहिलेलं नमूद करण्यात आलं आहे.

मात्र अजित पवार गटाच्या या योजनेच्या नावातून अजित पवार गटाने 'मुख्यमंत्री' शब्द वगळण्यात आला असून 'माझी लाडकी बहिण योजना' एवढाच उल्लेख पोस्टवर आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चाना उधाण आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group