..तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, तुम्हालाही ''हा'' मेसेज आलाय का ?
..तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, तुम्हालाही ''हा'' मेसेज आलाय का ?
img
दैनिक भ्रमर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनच्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. येत्या 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार आहे. पण सरकारकडून तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज आलेल्या महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी  अनेक अटी ठेवल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असू नये. या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत दीड कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. पण तरीही योजनेसाठी अद्यापही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 
दरम्यान , दीड कोटी महिलांनी नोंदणी केल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईल नंबरवर मेसेजही पाठवण्यात आला आहे. ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे. हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे. “Your application no (अर्जाचा नंबर) for MMLBY has approved – WCD, GOM – MAHGOV”, असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील असा मेसेज आला असेल तर तुम्हालादेखील या योजनेचा फायदा मिळणार आहे. तुमच्यादेखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत.


तसेच, अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना नारीशक्त अ‍ॅपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारकडून अर्ज भरण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली आहे. पण तरीही अनेक महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे. असं असलं तरी काही महिलांच्या बँक खात्यांमध्ये 1 रुपया आलेला आहे. तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे. त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group