शाब्बास !   लाडकी  बहिण योजनेतून महिलेने सुरू केला लघुउद्योग, ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद
शाब्बास ! लाडकी बहिण योजनेतून महिलेने सुरू केला लघुउद्योग, ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित आणि लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाखो महिलांनी लाभ घेतला आहे तर, काही महिलांना या महिन्यात या योजनेचा लाभ मिळेल अशी चर्चा आहे . जुलै पासून सुरु झालेल्या या योजेचेची एकूण ३ हजार रुपये रक्कम महिलांना ऑगस्ट महिन्यात मिळाली आहे . तर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलेलय महिलांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पॆसे मिळतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे . 

 दरम्यान, महिलांना या योजनेचा मोठा फायदा झाला. यातून काही सकारात्मक घडामोडीही समोर येत आहेपरळीतील एका महिलेने याच तीन हजार रुपयांमध्ये घरगुती लघुउद्योग सुरू केला आहे.

परळी शहरातील नेहरू चौक तळ विभागात राहणाऱ्या अक्षरा शिंदे यांनी ही यशोगाथा लिहिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना या योजनेत 3000 रुपये प्राप्त झाले. हे पैसे इतरत्र ठिकाणी कुठेही खर्च न करता त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आर्टिफिशल वटवृक्ष झाडे तयार केले. त्यांनी कृत्रिम वटवृक्ष या उद्योगाला सुरुवात केली. अक्षरा यांच्या सासू देखील या व्यवसायात त्यांना मदत करत आहेत. दीडशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत या झाडाची विक्री केली जाते आहे.

गौरी गणपती उत्सवात अक्षरा यांनी आर्टिफिशल वटवृक्षाची विक्री केली. त्यातून त्यांना खर्च वजा जाता 12 हजार रुपये प्राप्त झाले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा व्यवसाय मोठा करण्याचा विचारात त्या आहेत. सणासुदीच्या दिवसात या आर्टिफिशियल वटवृक्षाला परळी, अंबाजोगाई, सोनपेठ, परभणी या ठिकाणाहून मोठी मागणी होत आहे.  त्यांच्या या व्यवसायाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे व्यवसाय वाढीचा प्रयत्न अक्षरा शिंदे या करत आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group