राज्यात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे . दरम्यान , ऑगस्ट पर्यंत नोंदणी केलेल्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोनीही महिन्याचे पैसे एकत्रित मिळाले, परंतु आता सप्टेंबर मध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना दोन महिन्याच्या रकमेला मुकावे लागणार आहे . 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही .ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिली.
तसेच , लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत 70 ते 75 टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली.