राज्य सरकारने सुरु केलेल्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा' बोलबाला सर्वत्र सुरु आहे , दरम्यान रक्षाबंधनाच्या दरम्यान महिलांना एकत्रित पने योजेनचे दोन हफ्ते प्रदान करण्यात आले होते. दरम्यान सप्टेंबर महिनाही संपत आला असल्याने या योजनेचा तिसरा हफ्ता केव्हा मिळणार अशी चर्चा हाती . आता याच संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.
या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या २९ सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या (अर्जदार) खात्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. दरम्यान, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात.