महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम दिली जाते. दरम्यान डिसेंबर पर्यंतचे सर्वच हफ्ते लाभार्थी महिलांना मिळाले असून आता जानेवारी महिन्याचा हफ्ता केव्हा जमा होणार याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची तारीख आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली आहे. येत्या 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील,असे अजित पवारांनी सांगितले आहे. उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच महिलांना आता 26 तारखेची उस्तुकता लागली आहे.