राज्यातील बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आचारसंहितेमुळे तात्पुरती बंद करण्यात आली होती. दरम्यान आता राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली असून आता योजनेचा हफ्ता केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणी करत आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतेही डिटेल्स समोर आले नाहीत. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाह
लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. आचारसंहितेमुळे तूर्तास ही योजना स्थगित करण्यात आली होती. आता लवकरच पुन्हा ही योजना सुरू केली जाणार आहे.