राज्यसरकाच्या लाडक्या बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून लाखो महिलांना याचा लाभ मिळाला आहे. रक्षणबंधनाला राज्यसरकारने या योजेनेच्या २ हफ्त्यांची रक्कम म्हणजे ३००० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले होते. तसेच सप्टेंबर महिन्याचा हफ्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींसाठी शिंदे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी येत आहे या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे. दिवाळीपूर्वीच नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्याची तयारी सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळीचा धूम धडाका असेल. त्यातच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याने दिवाळीचा गोडवा वाढणार आहे.
काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला. काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच जमा होईल. नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची आचारसंहिता अगोदरच लागू शकते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता याच महिन्यात, ऑक्टोबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जमा करण्याचा शब्द दिला आहे.