मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार वाढ ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ग्वाही, म्हणाले...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार वाढ ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली ग्वाही, म्हणाले...
img
दैनिक भ्रमर
कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती  सोहळा संपन्न झाला.  या सोहळ्यात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजने विषयी मोठी ग्वाही दिली आहे .सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते . ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

तसेच , यातील 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसेही वितरीत करण्यात आले. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरूवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group