रेल्वे ट्रॅकवर फोनवर बोलत चाललेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. कानात असलेल्या इयरफोनमुळे या तरुणीला आपला प्राण गमवावा लागला आहे. कोल्हापुरातील हातकणंगलेत परिसरात हि थरारक घटना घाली आहे.
समोर आलेलय माहितीनुसार, कोल्हापुरातील हातकणंगलेत रेल्वे ट्रॅकवर फोनवर बोलत चाललेल्या 17 वर्षीय तरुणीचा धनबाद एक्स्प्रेसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनुष्का संतोष पोवार, रा. इचलकरंजी, असे मृत तरुणीचे नाव आहे. काल (ता 23) बुधवारी सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथील रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. अनुष्का आपल्या दोन मैत्रिणींसोबत रेल्वे रुळावरून चालत होती. त्यावेळी तिच्या कानात इयरफोन होते. मागून येणाऱ्या धनबाद एक्स्प्रेसचा अंदाज न आल्याने ती धडकेत गंभीर जखमी झाली.तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी तिला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक तपास सुरू केला असून, पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.
इअरबड्स घालून रेल्वे रुळावरून चालत जात असलेल्या अनुष्का संतोष पोवार (वय १७, रा. इचलकरंजी) हिला धनबाद एक्स्प्रेसने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. अनुष्काचा मृतदेह ३० फूट हवेत उडाला. रक्ताचा सडा अंगावर उडाल्याने मैत्रिणी बेशुद्ध पडल्या. त्या शुद्धीवर आल्यावर अपघाताचे गूढ उकलले. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली.
कोरोची येथे आरोग्य परिचरचे शिक्षण घेत असलेली अनुष्का दोन मैत्रिणींसोबत ग्रामीण रुग्णालयासमोर राहणाऱ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. सकाळी ११च्या सुमारास तिघी रुळाच्या बाजूने चालत होत्या. अनुष्का पुढे होती, तर तिच्या दोन मैत्रिणी वीस-तीस फूट अंतर मागे होत्या. रेल्वे येत असताना मैत्रिणी बाजूने ओरडत धावत अनुष्कापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या. अनुष्काला रेल्वेची धडक बसली आणि मैत्रिणींच्या डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला.
जमुईनंतर आता समस्तीपूरमध्येही मुलीसोबत बॅड टच; अनेक तरुणांकडून छेडछाड, व्हिडीओ व्हायरल
अनुष्काच्या दोन्ही कानांत ब्लूटूथ इअरबड्स असल्याने तिला मैत्रिणी ओरडण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवरून येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नसावा, असा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयातील जीवरक्षक स्वप्निल नरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.