नाशिक - नाशिक शहरातील बाजारपेठ असलेल्या रविवार पेठ आणि रविवार कारंजा या परिसरात बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन गुळ विक्रेत्यांवरती छापा टाकून लाखो रुपयाचा कमी दर्जाचा गूळ हा जप्त केला आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने मुख्य बाजारपेठेमध्ये केलेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच कळव उडाली आहे
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत तसेच येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांच्या दृष्टीने विविध अन्न पदार्थांवावत मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगे दि. २३ सप्टेंबर रोजी नाशिक शहरातील बाजारपेठ असलेल्या रविवार पेठेतील मे. राजेश ट्रेडींग कंपनी, व रविवार कारंजा परिसरातील मे. गौतम ट्रेडींग कंपनी, रविवार कारंजा, नाशिक या दोन ठिकाणाहून
गुळ (नंद) या अन्न पदार्थाचा १४९६ कि. ग्रॅ. किंमत रु. २लाख २४ हजार ४००, गुळ (अमृतराज) या अन्न पदार्थाचा २१४६ कि. ग्रॅ. किंमत रु. २लाख१४ हजार ६०० रुपये, गुळ (अवनी) या अन्न पदार्थाचा १२६० कि. ग्रॅ. किंमत रु. १लाख१३ हजार ४०० रुपये . गुळ (विना लेबल) या अन्न पदार्थाचा १७५७ कि. ग्रॅ. किंमत रु. १लाख ६० हजार ३४० रुपये अशा प्रकारे अन्न पदार्थाची एकूण किंमत रु. ७,
लाख १२ हजार ७४० रुपये इतका साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ मधील तरतुदीनुसार कमी दर्जा व भेसळीच्या संशयावरुन तसेच मानवी जीवनास अहितकारक ठरेल या कारणामुळे या दोन्हीही दुकानातील साठा जप्त करण्यात आला आहे.