महिलासुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून सध्या या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून आता एक अशीच घटना समोर आली आहे. 16 वर्षीय मुलीवर 47 वर्षीय शिक्षकाने अत्याचार केले आहे. संबंधित घटना मुंबईतील विलेपार्ले येथील पूर्व परिसरात घडली आहे. शिक्षकाचं नाव गणेश देवळूखकर असं असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकावर भारतीय न्याय संहिता आणि पोस्को (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
समोरआलेलया माहितीनुसार, कथित आरोपी आणि पीडित मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गणेश देवळूखकर याने सर्वात आधी व्हॉट्सॲपवर मेसेज करून पीडितेला भेटण्यासाठी बोलावलं. शिक्षकांनी भेटण्यासाठी बोलावलं असता, पीडिता भेटण्यासाठी गेली. ती भेटण्यासाठी गेल्यानंतर, शिक्षकाने तिचा हात पकडून पाठीमागून ओढलं… त्यानंतर तिला जबरदस्तीने मिठी मारली आणि 16 वर्षीय मुलीचा विनयभंद केला. शिक्षकाने मुलीचा लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
घडलेल्या घटनेनंतर आरोपी शिक्षक गणेश देवळूखकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नोटीस बजावून देवळूखकर याला अटक केली आहे. आता याप्रकरणी पुढील तपास पोलीस कसून करत आहेत. आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती समोर आली आहे.