काँग्रेसचा मोठा धक्का!
काँग्रेसचा मोठा धक्का! "या" नेत्यावर होणार पक्ष निलंबनाची कारवाई
img
Jayshri Rajesh
विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस एक्शन मोडमध्ये आलीय. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आसावरी देवतळे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय देवतळे यांना काँग्रेसने 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. ही कारवाई विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह समर्थकांना मोठा धक्का मानली जात आहे.

विजय वडेट्टीवार यांना धक्का

लोकसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरून पक्ष कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. डॉ. विजय देवतळे हे माजी मंत्री दादासाहेब देवतळे यांचे चिरंजीव असून वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत. तर आसावरी देवतळे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आणि वरोरा विधानसभेसाठी 2014 ला काँग्रेस उमेदवार होत्या.

 वडेट्टीवार यांचा धानोरकरांच्या उमेदवारीला विरोध

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीला प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरवर दावा केला होता. मात्र, धानोरकर यांनी आधीच निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. समाज माध्यमांवरून त्यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली होती. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता.

प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार होते. त्यांचे अकाली निधन झाले. मागील निवडणुकीत धानोकर हे महाराष्ट्रातून निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. प्रतिभा धानोरकर या आमदार होत्या. चंद्रपूर लोकसभेची जागा विजय वडेट्टीवार यांना शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी हवी होती. 

धानोकर यांनी यासाठी  कडाडून विरोध केला होता.अखेरीस धानोरकर यांना तिकीट मिळवण्यात यश आलं आणि त्या निवडूनही आल्या. मात्र, निवडणुकीत देवतळे दाम्पत्याने विरोधात काम केले. याचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्यात आला होता. यावरून काँग्रेसने 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित केले. ही कारवाई विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह समर्थकांना मोठा धक्का मानली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group