उन्हाळा सुरु झाला आहे. आता आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. कोकणातील हापूस आंबे आता बाजारात दाखल होतील. परंतु बाजारात फसवणूक सुरु आहे. कोकणातील हापूस आंबा जास्त किंमतीने विकला जात आहे. ही फसवणूक थांबावी म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. पुणेकरांना कोकणातील दर्जाचा आणि तोही बाजारातील किंमतीच्या तुलनेत स्वस्त मिळावा, या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
या पुढाकारातून खास करुन पुणेकरांसाठी पुणे शहरातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये हा आंबा महोत्सव सुरू करण्यात आला आहे.
उत्पादक ते थेट ग्राहक उपक्रमांतर्गत हा महोत्सव दि. १ एप्रिलपासून सुरू करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवात कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांमधील उत्तम दर्जाच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे.
दरम्यान बाजारात देवगड आंब्याच्या नावाखाली तुमची फसवणूक होत असते. मात्र, आता ही फसवणूक होणार नाही. कारण कृषी पणन विभागाने आंबा महोत्सवामध्ये प्रत्येक आंब्याला एक क्यूआर कोड दिलेला आहे. हा क्यूआर कोड तुम्हाला मदत करेल.