भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर
भाजपाकडून विधान परिषदेसाठी तीन उमेदवार जाहीर
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आटोपत असतानाच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजपाने तीन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार आणि आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाने संधी दिली आहे. विधान परिषदेच्या या जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.

लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्षांमध्ये एकमत झालेलं दिसलं नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे भाजपाची कोंडी झाली होती. मात्र भाजपाने कोकण पदवीधर मतदारसंघाच निरंजन डावखरे यांना पुन्हा संधी दिल्याने येथील लढत
रंगतदार होण्याची शक्यता आहे.





तर दुसरीकडे मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. किरण शेलार यांचा सामना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्याशी होणार आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून भाजपाकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवनाथ दराडे यांच्यासमोर ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर यांचे आव्हान आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group