राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्तिथीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक मदत करण्याचा प्रत्यत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकाने शेतकऱ्यांसाठी एक मोठा नि निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकापेक्षा अधिक बँकेमध्ये कर्जखाती असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे शेतकरी तपासू शकतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सध्या सुरू आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. आतापर्यंत १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १३ हजार २७५ कोटी रुपये जमा झाले आहेत. पहिल्या ३ याद्यांमध्ये २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरणानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे, असे देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकार मंत्र्यांनी पुढे सांगितले की, महाआयटीने तयार केलेल्या योजना पोर्टलवर बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. महाआयटीने केलेल्या संगणकीय प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांपैकी १५.८५ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर आतापर्यंत १३ हजार २७५ कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७ आणि तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेस आहे. आतापर्यंत ३ यादी जाहीर करण्यात आल्या असून त्यात एकूण २४ लाख ६७ हजार १३० पात्र शेतकऱ्यांचा समावेस आहे. आता चौथी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
एकापेक्षा अधिक बँकांमध्ये कर्जखाती असलेल्या आणि २ लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी आज प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
जी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे. यामध्ये १ एप्रिल २०२६ रोजी नंतरचे व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेसंदर्भात काही शेतकऱ्यांच्या ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असली तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार ही सर्व कर्ज निरंक करण्यात येणार आहेत.