यशश्री शिंदेचा मोबाईल सापडला, खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता
यशश्री शिंदेचा मोबाईल सापडला, खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
उरणमधील  यशश्री हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. यशश्री हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याची उद्या 13 ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपत आहे. याच दरम्यान  पोलिसांना मोठं यश  आल्याचं समोर आलय.यशश्रीचा गायब झालेला मोबाईल सापडला असून या मोबाईलमधून अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

या मोबाईलमधून यशश्रीच्या हत्येचा उलगडा होणार आहे. दाऊद शेख आणि यशश्रीचं संभाषण तसेच व्हॉट्सअप चॅटवरून या हत्येचा उलगडा होण्यास मदत होणार असून पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे.नवघर पोलीस स्टेशनच्या परिसरातच हा मोबाईल सापडला आहे. हो मोबाईल पाण्यात भिजल्याने तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. त्यात दाऊद शेख आणि यशश्रीचे संभाषण रेकॉर्ड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातून पोलिसांच्या हाती या प्रकरणाची बरीच माहिती मिळणार आहे.

दरम्यान , यशश्रीच्या या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ रेकॉर्डिंगही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण मोबाईल दुरुस्त झाल्याशिवाय त्यात काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटची माहितीही पोलिसांना मिळणार आहेत. त्यातूनही बराच उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेच्या दिवशी यशश्रीने कुणाकुणाला फोन केला होता, ती कोणत्या कोणत्या परिसरात गेली होती, याची माहितीही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोबाईलमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group