मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ''इतके'' अर्ज बाद ठरल्याची शक्यता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ''इतके'' अर्ज बाद ठरल्याची शक्यता
img
दैनिक भ्रमर
राज्यात जोरदार चर्चा असलेल्या लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात अवघ्या काही दिवसातच 3 हजार रूपये जमा होणार आहेत. ही रक्कम साधारण 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

पण तत्पुर्वी अर्ज बाद ठरलेल्या महिलांचा आकडा समोर आला आहे. साधारण अंदाजे 11 लाख 45 हजार अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. आता या बाद ठरलेल्या अर्जात तुमचा नंबर नाही ना? हे नेमकं कसं तपासायचं आणि पात्रता यादी कशी तपासायची हे जाणून घेऊया. 

तुम्हाला तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारीशक्ती दूत अॅपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारीशक्ती दूत अॅप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्या समोर आपल्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.

आपल्या अर्जाचे स्टेट्स  कोणते ?

>> तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दाखवत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

>> आपल्या अर्जात Pending for Approval असा पर्याय दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल.


>> आपल्या अर्जात Edit and Resubmit असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रूटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रूटी दिली आहे ती त्रूटी काढून आपला अर्ज परत सबमीट करावा लागणार आहे.

>> जर आपल्या अर्जात REJECT हा पर्याय दाखवत असेल तर आपल्याला आपला अर्ज का reject केला. या बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आलेला
आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group