विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून महाविकास आघाडीच्या हाती मात्र निराशा आली आहे. दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून विविध चर्चाना उधाण आले आहे.
दरंयान , आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महापालिकेच्या निवडणुका या जर मतपत्रिकेवर घेतल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच देशात सध्या हुकूमशाही सुरू असत्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.