१८ ऑगस्ट २०२४
जुलै महिन्यात जोरदार एन्ट्री घेतलेल्या मागील आठवडाभर पावसाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार आहे.राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा धुव्वांधार पाऊस पडत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील 4 ते 5 दिवस राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्याला आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Copyright ©2024 Bhramar