राज्यात येत्या दोन तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोली येथील राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक विवेक मासाळ पुण्यात येणार आहे. रोहिदास पवार यांना छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून पाठवले आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांची मुंबई रेल्वे पोलीस उपायुक्त पदी बदली केली आहे.
कोणाची कोठून कुठे बदली (कंसात नवीन ठिकाण)
संदीप पालवे, पोलीस अधीक्षक- एटीएस, छत्रपती संभाजीनगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड)
संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त-लोहमार्ग, मुंबई (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर)
सचिन गुंजाळ, पोलीस उपायुक्त ठाणे शहर (एटीएस, छत्रपती संभाजीनगर)
दत्ताराम राठोड, पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग नागपूर)
विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त नवी मुंबई (मुंबई)
रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग (नवी मुंबई)
प्रदीप चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी- सचिवालय मुंबई (पोलीस उपायुक्त मुंबई)
मीना मकवाना, पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (ठाणे शहर)
दत्ता नलावडे, पोलीस उपायुक्त मुंबई (लोहमार्ग, मुंबई)
राजू भुजबळ, पोलीस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिवालय, मुंबई)
रूपाली दरेकर, पोलीस अधीक्षक – नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर)
अनिता जमादार, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर),
लता फड, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे (पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर).