बँक एफडीचा 'हा' तक्ता एकदा नक्की पाहा! सरकारी, खासगी की स्मॉल फायनान्स बँक? कुठे मिळेल तुमच्या पैशाला अधिक सुरक्षा आणि व्याज?
बँक एफडीचा 'हा' तक्ता एकदा नक्की पाहा! सरकारी, खासगी की स्मॉल फायनान्स बँक? कुठे मिळेल तुमच्या पैशाला अधिक सुरक्षा आणि व्याज?
img
नितीशा कुलकर्णी






वाढत्या महागाईच्या काळात म्हातारपणाची तरतूद करणं हे सर्वात मोठं आव्हान ठरत आहे. मात्र, शेअर बाजारातील जोखीम टाळून सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा हवा असेल, तर 'फिक्स्ड डिपॉझिट' (FD) आजही वरिष्ठ नागरिकांची पहिली पसंती आहे. सध्या अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा अधिक व्याज देत असून, काही स्मॉल फायनान्स बँकांनी तर व्याजाचा टप्पा ८.५ टक्क्यांवर नेला आहे. सरकारी, खासगी की स्मॉल फायनान्स बँक? कुठे मिळेल तुमच्या बचतीवर सर्वाधिक परतावा, याचा सविस्तर आढावा. महागाई दिवसेंदिवस वाढतेय. अशावेळी सेव्हिंग करणं हे सर्वसामान्यांसाठी अवघड झालंय. तुम्हीही एक सीनियर सिटीझन आहात आणि कोणत्याही मार्केट रिस्कशिवाय स्थिर उत्पन्न आणइ सुरक्षित रिटर्न हवं असेल तर फिक्स्ड डिपॉझिट तुमच्यासाठी एक विश्वासार्ह ऑप्शन ठरू शकतो.

जास्तीत जास्त बँका सीनियर सिटीझन्सला सामान्य कस्टमरच्या तुलनेत 0.25% ते 0.50% पर्यंत अतिरिक्त व्याजदराचा फायदा देतात. ज्यामुळे त्यांच्या बचतीवर चांगलं रिटर्न मिळतं आणि नियमित उत्पन्नाचा एक सुरक्षित सोर्सही तयार होतो. अनेक वरिष्ठ नागरिकांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणं आवडतं. कारण त्यांना निश्चित आणि सुरक्षित उत्पन्न मिळतं. यासह गरज पडल्यावर कमी पेनल्टीसह प्रीमॅच्योर विड्रॉलची सुविधा, एफडीच्या बदल्यात लोन घेण्याचं ऑप्शन आणि सेव्हिंग अकाउंटशी संबंधीत स्वीप-इन सुविधासारखे फायदेही मिळतात. ज्यामुळे त्याची लिक्विडिटी आणि आर्थिक सुरक्षा दोन्ही चांगल्या राहतात. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्मॉल फायनेंस बँकांमध्ये सीनियर सिटीझन्सला सर्वाधिक व्याज दिलं जातंय. यात कोणकोणत्या बँका आहेत चला पाहूया. ESAF Small Finance Bank सीनियर सिटिझन्सला जवळपास 8.5% पर्यंत व्याज देते. विशेषतः 501 दिवसांच्या एफडीवर. ही एफडी सर्वात हाय इंटरेस्ट रेटमधून एक आहे. Shivalik Small Finance Bank 8.3% पर्यंत व्याज ऑफर करते.

याचं टेन्योर 21 महिने 1 दिवसांपासून 22 महिन्यांचा कालावधी आहे. Suryoday Small Finance Bank ही जवळपास 8.25% पर्यंत व्याज देते. विशेषतः 30 महिन्यांच्या एफडीवर. हा सर्वात भारी ऑप्शनमधून एक आहे. Equitas, Jana आणि Utkarsh Small Finance Bank सामान्यतः 8% व्याज देते. (2 ते 3 वर्षांच्या एफडीवर), जे सुरक्षित आणि स्थिर रिटर्नससाठी चांगले मानले जातात. लहान फायनेंस बँक सीनियर सिटीझनला जवळपास 7.75% ते 8.5% पर्यंतचं जास्त व्याज ऑफर करते. आता पाहूया की, कोणत्या प्रायव्हेट बँका सीनियर सिटिझन्सला एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहेत. SBM Bank India सीनियर सिटिझन्सला सर्वात जास्त जवळपास 8.35% पर्यंत व्याज देते.

जे 391 दिवसांपासून 15 महिन्यांच्या कालावधीवर मिळतं. हे प्रायव्हेट बँकांमध्ये सर्वात उच्च दरांमधून एक आहे. यानंतर Bandhan Bank, Jammu & Kashmir Bank आणि YES Bank जवळपास 7.75% पर्यंत व्याज ऑफर करते. जे 2 ते 5 वर्षांच्या एफडीवर मिळतं. RBL Bank आणि Tamilnad Mercantile Bank जवळपास 7.7% पर्यंत व्याज देते. DCB Bank हे 7.65% पर्यंत रिटर्न देतेय. मोठ्या प्रायव्हेट बँकांविषयी बोलायचं झाल्यास, ICICI Bank, HDFC Bank आणि IDBI Bank सामान्यतः 7% ते 7.1% पर्यंत व्याज ऑफर करते. एकूणच प्रायव्हेट बँकांमध्ये सीनियर सिजिझन्सला जवळपास 7% ते 8.35%पर्यंत सुरक्षित रिटर्न मिळू शकतं. PSU म्हणजेच सरकारी बँकांमध्ये सीनियर सिटीझन्ससाठी एफडीची सर्वात जास्त व्याजदर पाहूया. Punjab & Sind Bank सीनियर सिटिझिन्ससाठी जवळपास 7.25% पर्यंत व्याज देते.

जे 666 दिवसांच्या एफडीवर मिळतं. Bank of Maharashtra जवळपास 7.15% पर्यंत व्याज ऑफर करते. विशेषतः 400 दिवसांच्या एफडीवर. यासोबतच Bank of India (Star Swarnim), Canara Bank, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab National Bank आणि Union Bank of India सारख्या बँका 7.1% पर्यंत व्याज 444 ते 555 दिवसांच्या कालावधीवर देतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सीनियर सिटिझन्सला 7.05% पर्यंत व्याज देते. हे 5 ते 10 वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर दिलं जातं. पीएसयू बँकांमध्ये एफडी दर जवळपास 7% ते 7.25% दरम्यान स्थिर आणि सुरिक्षत रिटर्न ऑफर करते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group