RBI चा 'या' बँकेला मोठा  दणका ! तब्बल  1.27 कोटींचा ठोठावला दंड
RBI चा 'या' बँकेला मोठा दणका ! तब्बल 1.27 कोटींचा ठोठावला दंड
img
दैनिक भ्रमर
सर्व बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे . दरम्यान ,  भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्राला मोठा झटका दिला आहे. विविध नियमांचे पालन न केल्याबद्दल या बँकेला तब्बल 1.27 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. 8 ऑगस्ट 2024 रोजी याविषयीचे आदेश काढण्यात आले आहेत. बँकेने कर्ज प्रणाली ऑफर डिलिव्हरी ऑफ बँक क्रेडिट, सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क इन बँक क्रेडिट आणि KYC बाबत जारी केलेल्या नियमांचे बँकेने पालन न केल्यामुळे RBI ने हा दंड ठोठावला आहे.

आरबीआयने 31 मार्च 2023 पर्यंत बँकेची आर्थिक स्थिती आणि मे 2023 पर्यंत बँकेच्या माहिती तंत्रज्ञानाचीही स्थिती तपासली होती. यात बँकेने आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याचे आढळून आले. यानंतर आरबीआयने बँकेला नोटीस बजावून बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल बँकेला जास्तीत जास्त दंड का लावू नये, अशी विचारणा केली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडवर केवायसी निर्देशांचे पालन न केल्याने 2016 मधील केवायसी नियमानुसार कारवाई केली. हिंदुजा फायनान्सला 4.90 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तर पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडवर 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

आरबीआयने सांगितले की नोटीसला उत्तर दिल्यानंतर, वैयक्तिक सुनावणी आणि बँकेने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रावरील आरोप सिद्ध झाले. काही कर्जदारांच्या बाबतीतही बँकेने नियमांचे पालन केलं नसल्याचे यात समोर आले. सर्व डिलिवरी चॅनेलसाठी फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट सिस्टम लागू करण्यात बँक अपयशी ठरली. युनिक ग्राहक ओळख कोड जारी करण्याऐवजी, बँकेने ग्राहकांना एकाधिक ग्राहक ओळख कोड जारी केले आहेत. याशिवाय बँकेने नियामक आवश्यकतांची पूर्तता न करणाऱ्या काही लहान खात्यांमध्ये ऑपरेशनला परवानगी दिली. यापूर्वी केंद्रीय बँकेने खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक, एसबीआयवर दंड ठोठावला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group