नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- उत्तर महाराष्ट्र मधील प्रमुख अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या जनसंपर्क संचालकपदी अरुण वामनराव जाधव यांची निवड करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड व ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
अरुण जाधव गेल्या सहा वर्षपासून देवळाली व्यापारी बँकेत संचालक म्हणून काम करीत आहेत. देवळाली कॅम्प येथील राहिवसी व याच भागात शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी म्हणून ते काम करतात. तत्कालीन जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी जाधव यांची जनसंपर्क संचालक म्हणून निवड जाहीर केली व त्याबाबतचे पत्र त्यांना दिले. यापूर्वीही जाधव यांनी जनसंपर्क संचालक म्हणून काम केले आहे.
व्यापारी बँकेने गत आर्थिक वर्षात व्यवसायात गगन भरारी घेत एकूण व्यवसायचा एक हजार कोटींचा टप्पा पार केला असून यंदाच्या आर्थिक वर्षात एक हजार पाचशे कोटीचा टप्पा गाठणार आहे. त्यासाठी सर्वाना सोबत घेऊन चिकाटीने काम करू अशी निवडीनंतर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.
या प्रसंगी ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, संचालक वसंत अरिंगळे, गणेश खर्जुल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, रमेश धोंगडे, योगेश नागरे, सुधाकर जाधव, रामदास सदाफुले, तत्कालीन जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे, कमल आढाव, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागिरे, मंगेश फाडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, सहाय्यक महाव्यवस्थापक (सामान्य प्रशासन) दिनेश नाथ आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते.