छत्तीसगडच्या नाइला रेल्वे स्थानकाजवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह आढळ्यानंतर हे प्रकरण समोर आले. या घटनेचा अधिक तपास सध्या सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून राजकारणात सक्रिय होते. चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शुक्रवार (ता. २७ सप्टेंबर) रोजी छत्तीसगडच्या नाइला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि नाइला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह नाइला येथील भाजप नेते शेखर चंदेल यांचा असल्याचे तपासात समोर आलं आहे.
शेखर चंदेल यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शेखर चंदेल रात्री 8.30 वाजता आपल्या राईस मिलमधून पायी निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. मोबाईलवर बोलत बोलत ते जात होते. याचवेळी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळल्याची दिल्याची माहिती मिळाली. त्यांनी घातेलेल्या शर्टावरुन त्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.